Pune : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एमसीई सोसायटीची शनिवारी श्रद्धांजली सभा

एमपीसी न्यूज- काश्मीरमधील सैन्यदलावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीने शनिवारी (दि. 16) श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.

सकाळी 9 वाजता ही श्रद्धांजली सभा आझम कॅम्पस येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांनी दिली. संस्थेचे पदाधिकारी, दहा हजार विद्यार्थी, प्राध्यापक, सेवकवर्ग उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.