Pune : ‘संवेदन’मधून साकारली जाणार पंचमहाभूतांवरील तन्मात्र नृत्यरचना

एमपीसी न्यूज -कथक सम्राज्ञी गुरु पंडिता रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ प्रकृति कथक नृत्यालयातर्फे संवेदन मैफलीचे येत्या ८ तारखेला आयोजन करण्यात आले आहे.  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे ही मैफल सायंकाळी सात वाजता होणार आहे .

पंचमहाभूतांवरील तन्मात्र ही संरचना हे या मैफिलीचे प्रमुख आकर्षण असून नृत्यभारती संस्थेच्या २० नृत्यकलाकार एकाच मंचावर ही रचना साकारणार आहेत. वैशिष्ट्य म्हणजे याचे संगीतही रोहिणी भाटे यांचे आहे. तब्बल २५ वर्षांनंतर ही कलाकृती रंगमंचावर संवेदनच्या निमित्ताने सादर होत आहे. याची संकल्पना रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व संस्थेच्या संचालक नीलिमा अध्ये यांची आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या धृपद गायन शैलीतून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे पंडित उदय भवाळकर यांच्या सुश्राव्य गायनाचा देखील आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.