मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune crime : पत्नीचा नांदण्यास नकार, नातजावयाने केला सासूला ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : पत्नी नांदण्यास येत नाही त्याला कारणीभूत सासू असल्याचा संशय आल्याने नातजावयाने सासूवर खुनी हल्ला चढवला. (Pune crime) पुण्यातील कात्रज परिसरात बुधवारी ही घटना घडली. 74 वर्षीय सासूच्या डोक्यात फरशीने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रत्‍नाबाई अण्णा लगस (वय 74) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. नातजावई राहुल सुदाम शिंदे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : अफवांवर विश्वास ठेवू नका, विक्रम गोखलेंवर उपचार सुरु, मित्र राजेश दामलेंची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल शिंदे याची पत्नी त्याच्याजवळ राहत नाही. त्याला कारणीभूत सासू आहे, तीच पत्नीचे कान भरते असा संशय राहुल शिंदे आला होता.(Pune crime) हाच राग मनात धरून त्याने बुधवारी दुपारी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर फरशीचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Latest news
Related news