BNR-HDR-TOP-Mobile

Pune : खडकवासला धरण 100 टक्के भरले !

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि परिसरात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी रात्री उशिरा धरण 100 टक्के भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मध्यरात्री 2 वाजल्यापासून 1700 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील कळमोडी धरण देखील 100 टक्के भरले आहे

HB_POST_END_FTR-A1
.