Pune : या कारणामुळे पर्यटकांसाठी खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला बंद

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंद

एमपीसी न्यूज : पुणे शहरात वीकेंडसाठी सिंहगड किल्ला  किंवा खडकवासला चौपटीवर चांगलीच गर्दी असते. शनिवार आणि रविवारी अनेक जणांची पावले पर्यटनासाठी या ठिकाणी वळतात. (Pune) परंतु रविवारी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना नो एन्ट्रीच्या समस्येला समोरे जावे लागले. रविवारी आणि सोमवारी (14 आणि 15 मे) रोजी सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपटी पर्यंटकासाठी बंद करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. 

Pimpri : सांगवी एफसी ब, पुणे वॉरियर्सचा संघर्षपूर्ण विजय

खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला उद्या दुपारी 2 पर्यंत बंद राहणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक नाराज झाले आहे. (Pune) सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

रविवारी गड बंद असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले. अनेक पर्यटक लांबून आले होते. त्यांना गड का बंद आहे, याची माहिती मिळत नव्हती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.