Pune : केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्रात प्रशिक्षण

एमपीसी न्यूज- खादी ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र (पुणे) येथे कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्प कार्यक्रमांतर्गत अंदमान -निकोबार ,ओरिसा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच 18 ते 22 मार्च दरम्यान पार पडला.

मधुमक्षिका पालनातील नवे तंत्र, राणीमाशीची कृत्रिम निर्मिती, रोग, नियंत्रण, अधिकाधिक मध उत्पादन याची माहिती देण्यात आली. साधना सरपोतदार, नवनाथ शितोळे, संतोष मनोहर ,किशोर मराठे ,ओंकार पुजारी ,सागर कुदळे सहभागी झाले. कृषी विभागाचे उसुफ यांनी मार्गदर्शन केले. संशोधन केंद्राचे सहसंचालक सुनील पोकरे, हेमराजसिंह मुवेल यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

आर जी बोबडे, एन आर भिलारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. प्रशिक्षणार्थीना मधमाशा वसाहती आणि सामग्री केंद्रातर्फे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.