Pune : खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची किरीट सोमय्या यांनी घेतली सांत्वनपर भेट

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे (Pune) काल निधन झाले. आज भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीनिवास पाटील, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतले.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 31 – एकाकी लीना चंदावरकर

त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार सुजय विखे पाटील, काँग्रेस  पक्षाचे (Pune) नेते आमदार विश्वजीत कदम यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन अनेक आठवणींना उजाळा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.