Pune – अंडा भुर्जीची ‘चव’ आवडली नाही म्हणून डोक्यात मारला तवा ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – चवीने खराब लागलेल्या अंडाभूर्जीच्या बदल्यात दूसरी भूर्जी मागितल्यामुळे झालेल्या वादामध्ये  ग्राहकाला मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याची  घटना रविवारी (दि.9) रात्री नऊच्या सुमारास आय.सी.सी. टॉवर बहीरटवाडी येथे घडली.

गणेश बिच्छा शिंदे( वय 31, रा. वैदुवाडी), शंकर चिनाप्पा शिंदे(वय 28, रा.वैदुवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी गुरूदेव लोखंडे (वय 32, रा. वैदुवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरूदेव लोखंडे हे रविवारी रात्री बहीरटवाडी येथील आयसीसी टॉवरजवळील गणेश शिंदे यांच्या अंडाभूर्जीच्या गाडीवर भूर्जी खाण्यासाठी गेले होते. फिर्यादी यांनी भूर्जीचा एक घास खाल्ला असता त्यांना तीची चव खराब लागली त्यामुळे त्यांना त्याच्याबदल्यात दूसरी भूर्जी मागितली. या कारणावरून कामगार शंकर आणि फिर्यादी यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की सुरू झाली. दरम्यान गणेश शिंदे याने देखील त्याच्या हातात असलेल्या कांदा कापायच्या चाकूने फिर्यादीच्या पोटावर आणि शरीरावर वार केले. एवढेच नाही तर लोखंडी पाते असलेला अंडाभूर्जीचा तवादेखील डोक्यात घालून फिर्यादीला गंभीररित्या जखमी केले.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.