Pune : कोमल टिंगरे यांची राष्ट्रवादी युवती राज्य सचिव पदावरून हकालपट्टी!

एमपीसी न्यूज -जाहीररीत्या पक्ष विरोधी कार्यवाही करीत असल्याने कोमल टिंगरे यांची राष्ट्रवादी युवती राज्य सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी त्यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

कोमल ही राष्ट्रवादीचा नगरसेविका रेखा टिंगरे यांची मुलगी आहे. तिचे वडील चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपात प्रवेश करून वडगावशेरी मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे.

पत्नी राष्ट्रवादीचा नगरसेविका असताना पती भाजपचा विधानसभा निवडणुकीत प्रचार करीत आहे. त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.