Pune : कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोरोनाच्या 25 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या परिमंडळ क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या कोंढवा – येवलेवाडी हद्दीतील कोरोनाच्या 25 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.

कोव्हीड – 19 सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार सिंहगड कॉलेज कोंढवा बुद्रुक येथे या रुग्णांना डिस्चार्ज डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ठिकाणी दि. 28 एप्रिल 2020 पासून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार 271 रुग्णांना प्रतीक्षा कालावधी तसेच विलगीकरण कालावधीसाठी ठेवण्यात आले होते.

या कोव्हीड सेंटरची एकूण क्षमता 327 रुग्ण इतकी आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज कार्ड, गुलाब पुष्प आणि सॅनिटायजर देऊन यापुढे घरीच विलगीकरण आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा कदम, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका संगीता ठोसर, वृषाली कामठे, विरसेन जगताप, सहाय्यक महापालिका आयुक्त सुरेश जगताप, रविंद घोरपडे, नोडल ऑफिसर राजेंद्र थोरात, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, इनचार्ज डॉ. दिप्ती बच्छाव, डॉ. किरण लाटणे, डॉ. निलेश भोसले, डॉ. सुनील आंधळे, डॉ. मिलिंद खेडकर, डॉ. अरविंद मकर, डॉ. स्नेहल गोल्हार व अन्य अधिकारी, फार्मासिस्ट रघुनाथ खाडे, सत्यपाल परदेशी आणि इतर सेवक उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय सुविधा आणि अन्य सुविधांबाबत महापौरांनी समाधान व्यक्त केले. तर पुणे शहरात रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. कोरोना झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात करता येऊ शकते, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like