_MPC_DIR_MPU_III

Pune : कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफिस, सर्व पेठांचा भाग सील करणार -शेखर गायकवाड

आज रात्री 12 पासून निर्णयाची अंमलबजावणी; आयुक्त यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ‘कोरोना’ विषाणू बाधितचे रुग्ण आढळून येत असल्याने पुणे महापालिकेने आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफिस, सर्व पेठाचा भाग सील करण्यात येणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. आज रात्री 12 वाजल्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

हा भाग सील करण्यात येणार असल्याने लोकांच्या जाण्या-येण्यावर बंधने येणार आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

सील करण्यात येणार असलेल्या भागांत 37 पेशन्ट आढळले आहेत. तर, आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लोकांना वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याने महापालिका प्रशासनाने ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला आहे. मागील चार दिवसांत पुण्यात दररोज 20 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हा कोरोना आता झोपडपट्टीतही घुसला आहे.

मार्केट यार्ड सुरूच राहणार
पुणे महापलोकतर्फे आज रात्री 12 वाजल्यापासून गुलटेकडीसह काही भाग सील करण्यात येत असला तरी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला, फळे खरेदी-विक्री सुरूच राहणार आहे. कोंढवा भागांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील लोकांना 100 टक्के मास्क वापरणे बंधनकारक आहे. पुणे शहरात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढले तर टप्प्याटप्प्याने इतर भागही सील करण्यात येणार आहे, असेही पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.