Pune: पोलिसांनी जेरबंद केला अट्टल चोरटा, साडेपाच लाखांचे 54 मोबाईल हस्तगत

Pune: kondhwa Police arrested thief and seized 54 mobile phones worth Rs 5.5 lakh कोंढवा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी कमला पार्क परिसरात सापळा रचला. यावेळी त्यांना पाहून एक इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

0

एमपीसी न्यूज- कोंढवा पोलिसांनी एका सराईत चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे साडेपाच लाख रुपये किमतीचे 54 मोबाईल हस्तगत केले. खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळ रचत ही कारवाई केली. कोंढव्यातील कमला चौक परिसरात सोमवारी ही कारवाई करण्यात आली.

येडप्पा हिरेकरू (वय 25) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एक जण कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी कमला पार्क परिसरात सापळा रचला. यावेळी त्यांना पाहून एक इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 54 मोबाईल आढळून आले. या सर्व मोबाईलची किंमत अंदाजे साडेपाच लाख रुपये इतकी आहे.

पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात दाखल केले असता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like