Kondhwa: कोंढवा-उंड्री भागातील नागरिकांना मिळणार पुरेशा दाबाने पाणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 कोंढवा खुर्द येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9 मार्च) सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. या कामामुळे कोंढवा भागातील एनआयबीएम, उंड्री रस्त्यावरील उंचावरील सोसायट्यातील जवळपास सव्वालाख नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

यावेळी श्री गुरुनानक देवजी उद्यानाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील हडपसर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक 26 येथील एनआयबीएम रस्त्यालगत कोंढवा खुर्द स. न. 26/1 मधील अमेनिटी स्पेसवरील ताब्यात आलेल्या जागेवर हे उद्यान विकसीत करण्यात आले आहे. एकूण क्षेत्र 2543 चौ. मी. आहे. 200 मी. स्टॅम्प काँक्रीटचा ट्रॅक आहे. लहान मुलांसाठी वयोगटानुसार खेळणी बसविण्यात आलेली आहेत. तसेच, नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बेंचेस बसविण्यात आलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.