Pune : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाला शेवटची मुदतवाढ; गृह विभागाचे आदेश

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणी (Pune) चौकशी आयोगाला 30 जूनपर्यंत शेवटची मुदतवाढ दिली आहे. राज्याच्या गृह विभागाने 28 मार्च रोजी यासंदर्भात आदेश जारी केला आणि आयोगाला आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगितले.
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचाराची नोंद झाली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते.
BJP : संजय राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का आहेत का?- किरीट सोमय्या
आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुरुवातीला चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु त्याचे काम (Pune) पूर्ण करण्यासाठी आयोगाला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आयोगाला वेळोवेळी मुदतवाढ मिळाली. कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान आयोग काम करू शकला नाही. गेल्या पाच वर्षांत आयोगाला देण्यात आलेली ही अकरावी मुदतवाढ आहे.