Pune : गुरुवारी कोरेगाव पार्क ठरले हॉटेस्ट प्लेस ? पारा 44 अंशावर 

एमपीसी न्यूज – पुणेकर सध्या उकाड्याने पुरते हैराण झाले ( Pune ) आहेत. पुण्यात गुरुवारी (दि.11 ) पारा हा सरासरी 40 अंशावर असल्याचे पहायला मिळाले. तर कोरेगाव पार्क परिसर येथील तापमान तर 44.4 अशं एवढे नोंदवले गेले आहे.

Nigdi Crime : तरुणाला दगडाने व चॉपरने मारहाण, दोघांवर गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचला आहे. आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान 4.5  अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले असल्यास उष्णतेची लाट आली असे समजले जाते.

गुरुवारी पुण्यातील परिस्थिती – (ठिकाण – तापमान अंश सेल्सीअसमध्ये)

कोरेगाव पार्क – 44.4

तळेगाव ढमढेरे – 43.8

वडगाव शेरी    – 43.1

शिरूर – 42.9

राजगुरुनगर – 42.9

खेड – 42.7

चिंचवड – 42.5

डुडुळगाव 42.4

हडपसर – 42

बालेवाडी- 41.8

लवळे – 41.7

मगरपट्टा – 41.7

तळेगाव दाभाडे – 41.6

पाषाण – 41.1

शिवाजीनगर – 41

एन.डी.ए – 40.5

लोणावळा – 38.8

भोर- 37.8

 

राज्यातही पारा 40 पार 

गुरुवारी जळगावात 44 अंशांच्या वर तापमान होतं. तर अकोल्यात 43.5 आणि धुळ्यात 42.0 अंश सेल्सियस तापमान नोंद झालं. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42  ते 45 अंश सेल्सियसवर तर पुण्यात 40 आणि मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सियसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.