Pune: कोशकार य. रा. दाते यांच्या घरावर नीलफलक

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या वतीने भारतीय संविधान (Pune)अर्थात घटना भाषांतर समितीवर सलग चार वर्षे नियुक्ती झालेले, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र भाषाभ्यास, सुलभ विश्वकोश, महाराष्ट्र वाक् संप्रदायकोश, शास्त्रीय परिभाषा कोश असे कोश संपादित केलेले कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांच्या घरावर नुकताच नीलफलक (Blue Plaque) बसविण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (केसरी ट्रस्ट) अंतर्गत पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समितीच्या वतीने कोशकार (Pune)य. रा. दाते यांच्या मॉडेल कॉलनी येथील ‘संविधान’ या घरावर भूतकाळातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदानाचे ऋण प्रकट करण्याच्या दृष्टिकोनातून सदर नीलफलक बसविण्यात आला. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ दीपक टिळक, य. रा. दाते यांच्या कन्या उषा पाटणकर, वि. म. बापये, आशा पुरंदरे आणि दाते कुटुंबीय उपस्थित होते.

Ravet : गॅस एजन्सीची पाऊण कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांकडून अटक

भारतीय संविधान दिनाच्या दिवशी, योगायोगाने, घटना भाषांतर समितीवर सलग चार वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या कोशकार य.रा. दाते. यांच्या ‘संविधान’ या घरावर हा नीलफलक लागणे ही एक आनंदाची बाब आहे. घटनेचे मराठी भाषांतर होत असतानाच्या काळात, आकारात येणाऱ्या आपल्या मॉडेल कॉलनी येथील घरास ‘संविधान’ असे नामकरण करणे हे त्याचे देशप्रेमाचे द्योतक असल्याचे दाते कुटुंबियांनी सांगितले.

याबद्दल अधिक माहिती देताना कोशकार य. रा. दाते यांच्या कुटुंबातील स्नेहा दाते-रानडे म्हणाल्या, “माझे पणजोबा य. रा. दाते यांचा जन्म 17 एप्रिल, 1891 चा तर 21 मार्च 1973 रोजी त्यांचे निधन झाले.

त्यांनी अनेक क्षेत्रांत काम केले. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने भारतीय संविधान अर्थात “घटना भाषांतर समिती”वर सलग चार वर्षे त्यांची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र भाषाभ्यास, सुलभ विश्वकोश, महाराष्ट्र वाक् संप्रदायकोश, शास्त्रीय परिभाषा कोश असे पाच कोश त्यांनी संपादित केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुण्यातील पहिली रात्र शाळा असलेल्या सरस्वती विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष, सोलापूर येथे भरलेल्या मुद्रक संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक व शांतता परिषदेच्या निमित्ताने त्यांनी रशिया, कोरिया, चीन, जर्मनी आदी देशात भारताचे प्रतिनिधित्वही आणि सामाजिक कार्य म्हणून विधवा पुनर्विवाहात पौरोहित्याचे कामही केले. त्यांच्या या कामाचे ऋण व्यक्त करण्याच्या हेतूने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बसवण्यात आलेला हा नीलफलक आम्हा सर्व कुटुंबियांसाठी अभिमानाची बाब आहे.”

नीलफलक या संकल्पनेविषयी –
नीलफलक संकल्पनेची सुरुवात जयंतराव टिळक यांनी केली. ते 1990 साली इंग्लंडला गेले असता, त्यांना लोकमान्य टिळक यांचे लंडनमध्ये वास्तव्य असलेल्या वास्तूवरचा एक Blue Plaque’ म्हणजेच नीलफलक दृष्टीस पडला व त्यांना पुण्यातील अशाच अनेक महत्त्वाच्या वास्तू आठवल्या. त्यातून ‘पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती’ समितीची स्थापना झाली त्या समितीचे कार्य लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (केसरी ट्रस्ट) अंतर्गत सुरू झाले. णे शहरात पहिला नील फलक 12 नोव्हेंबर 1995 रोजी शिवराम महादेव परांजपे ज्या वास्तुत राहत होते तेथे बसवला.

गेल्या 28 वर्षात समितीतर्फे असे एकूण 135 नीलफलक बसवले गेले. कमिटीचे संस्थापक सदस्यात दिवेकर, सोहोनी, म श्री दीक्षित, वि. मा बाचल, सारंग साठे यांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात वास्तूचे निश्चितीकरण संबंधितांची परवानगी, वारसा विषयक कोणताही दावा नसण्याची ग्वाही असे अनेक प्रश्न होते. त्यांची सोडवणूक करणे हे एक आवाहन होते. आज अनेक नीलफलक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जसे रमाबाई रानडे, हिराबाई बडोदेकर, सी. रामचंद्र, पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे, गोपाळ कृष्ण गोखले, डी डी कोसंबी, व्ही. शांताराम इत्यादी व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे ट्रस्टने त्यावर एक पुस्तकही प्रकाशित केले.

कोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे एकेकाळचे सहाध्यायी आणि तब्बल 6 ज्ञानकोशाची निर्मिती केलेले (त्यातील काही दाते – कर्वे शब्दकोश म्हणून प्रसिद्ध आहेत.) साहित्यिक आणि शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केलेले य.रा.दाते यांचा आज मरणोत्तर तब्बल 50 वर्षांनी गौरव होत आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.