BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने कोथरूडकर रसिक चिंब

0

एमपीसी न्यूज – श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये हजारो कोथरूडकर रसिक चिंब झाले. कोथरूडमधील कै. तात्यासाहेब थोरात उद्यान येथे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार यांनी केले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध ‘पीएनजी ज्वेलर्स’चे कार्यकारी संचालक पराग यशवंत गाडगीळ, संचालक वैशाली विद्याधर गाडगीळ, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बढेकर ग्रुपचे अण्णा बढेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे ही जशी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तशी, कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. जागतिक स्तरावरचे अनेक कलाकार आपली कला कोथरूडमध्ये सादर करण्यासाठी उत्सुक असतात. कारण या भागात रसिक, चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. ज्यांनी आपल्या कार्याने – कर्तृत्वाने स्वतःचे कोथरूडचे व आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. याचा आपल्या कोथरूडकरांना निश्चितच अभिमान असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

आमची संस्था दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. आपण आपली संस्कृती जपली, जोपासली पाहिजे. आपला हा सांस्कृतिक वारसा असाच कायम पुढे चालू राहिला पाहिजे. आशा दर्जेदार व प्रसिद्ध कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन कायम करीत राहील, असेही सुतार म्हणाले.

कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सत्यजित धांडेकर, अनिल बिडलान, धर्मराज सुतार, विनायक मारणे, संदीप अच्युत हे निमंत्रक होते. सुधीर वरघडे, नचिकेत घुमटकर, चंद्रकांत बोऱ्हाडे, अनिल भगत, जितेंद्र भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रवीण गोखले यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3