Pune : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ; कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत

एमपीसी न्यूज-पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत (Pune) माजवली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली. इतकेच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवन च्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला.

याप्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी तक्रार दिली आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPC News Podcast 26 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना आरोपी त्या ठिकाणी आले. हातातील कोयते दाखवत त्यांनी क्रिकेट बंद करा, असे धमकावून शिविगाळ केली आणि मैदानात दगड फेकले. या सर्वांना घाबरून फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांना बॅटने मारहाण केली. तर त्यांच्यावर कोयते देखील उगारले. आरोपींनी त्या ठिकाणी पार्क केलेल्या चार ते पाच दुचाकी वाहनांची आणि एका चार चाकी वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला (Pune) अटक केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.