Pune : केव्ही सदर्न कमांडच्या विद्यार्थिनीं आज साधणार पंतप्रधानांशी संवाद

एमपीसी न्यूज – कॅम्प भागातील सदर्न कमांड केंद्रीय विद्यालयातील प्रतीक्षा प्रदीप निकम आणि सृष्टी विलास इंगळे या आज सोमवारी (दि. 20 जानेवारी 2020 रोजी) दिल्ली येथे होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील एक हजार आठशे विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या“परीक्षा पे चर्चा“ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून 104 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून, याचे डीडी न्यूजसह देशभरातील महत्वाचे न्यूज चॅनेल व आकाशवाणीवरून प्रसारण होणार आहे.

प्रतीक्षा ही इयत्ता बारावीत शिकत आहे, तर सृष्टी ही इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. तिने ‘अवर एज्युकेशन नीडस् इन इम्प्रूवमेंट’, या विषयावरील निबंध लिहिल्याने या कार्यक्रमात निवड झाली. प्रतीक्षा व सृष्टी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातील सहभागाबद्दल प्राचार्या स्नेहल मराठे यांनी त्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.