Pune : शहरात जीवनावश्यक वस्तूंचा आजही तुटवडाच!

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना ‘लॉकडाउन’मधून वगळण्याची घोषणा केली होती, तरीही त्या वस्तूंचा तुटवडा शहरात आजही जाणवत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शहराच्या अनेक भागात किराणा मालाची दुकाने आजही बंद होती. संचारबंदीतून या दुकानांना वगळले असले तरी मालाचाच तुटवडा जाणवत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

अनेक ठिकाणी विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये रेशन दुकानेही बंद असल्याने तेथील लोकांची प्रचंड गैरसोय झाली. लोकांनी संताप व्यक्त केला. धान्य स्वस्त दरात किंवा मोफत वाटपाची सरकारची घोषणा फसवी असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली. ग्राहक पेठ आणि सुपर मार्केट्सही बंद होती.

वर्तमानपत्रे आज प्रकाशित झाली, परंतु उपनगरांमध्ये घरपोच अंक मिळू शकले नाहीत. शहराच्या अनेक भागातील खाजगी दवाखाने त्या-त्या डॉक्टर्सनी बंद ठेवल्याचे आढळले त्यामुळे रुग्णांचे खूप हाल होत आहेत. अजून १५ दिवस लॉकडाउन रहाणार असून जीवनावश्यक वस्तूंबाबतची ही परिस्थिती कधी बदलेल? याबाबत अनिश्चितता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.