BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी पुण्यातील महिला डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी

0 1,501
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिला डॉक्टरला न्यायालयाने मंगळवारी तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव आहे.

या बाबतची माहिती अशी की, पुण्यातील विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक सेंटर नावाचे हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी डॉ. मकरंद रानडे आणि डॉ. नीना मथराणी हे दोघे मिळून गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती तथापी संस्था आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेला मिळाली होती. ही माहिती राज्य कुटुंब कल्याण मंडळाला देण्यात आल्यानंतर त्या माहितीनुसार एका जोडप्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्याठिकाणी डॉ. रानडे यांनी नऊ हजार रुपये घेऊन त्यांना डॉ. मथरानी यांच्या सोनोग्राफी केंद्रात पाठवले.

डॉ. मथरानी यांनी कोणताही अर्ज भरून न घेता तपासणी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर कायदेशीर कारवाई करून डॉ. रानडे यांचे हॉस्पिटल आणि डॉ. मथराणी यांचे सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले. तसेच त्यांचा परवाना देखील जप्त करण्यात आला. या प्रकरणात रानडे हॉस्पिटलचे डॉ. मकरंद रानडे आणि डॉ. मथराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुनावणी दरम्यान डॉ. रानडे यांचा मृत्यू झाला. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान डॉ. नीना मथराणी यांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली मात्र सुनावणी दरम्यान डॉ. रानडे यांचा मृत्यू झाला. या खटल्याचे कामकाज पुणे महापालिकेचे वकील आनंद रणदिवे यांनी पहिले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3