HB_TOPHP_A_

Pune : मांजाने कापला दुचाकीस्वार महिलेचा गळा ; गळ्याला पडले 5-6 टाके

273

एमपीसी न्यूज-  दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मांजाने गळा कापल्याची  घटना मंगळवारी (दि.15) सायंकाळी कोथरुड येथील आशिष गार्डनजवळ घडली.

HB_POST_INPOST_R_A

प्रिया हेमंत शेंडे(वय 45, रा.भुसार कॉलनी, कोथरुड) असे जखमी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया शेंडे या त्यांच्या नातेवाईकांकडे मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी त्यांच्या भाचीसोबत दुचाकीवरून निघाल्या होत्या.

गळ्याला काहीतरी कापल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी गाडी थांबवली. मांजाने गळा कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. गळा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्या भाचीने नागरिकांच्या मदतीने तात्काळ त्यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू झाले आणि त्यांचे प्राण वाचले. परंतू यामध्ये त्यांच्या गळ्याला 5-6 टाके पडल्याचे समजत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: