Pune : पोटच्या चिमुकल्याचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- सासूच्या छळास कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास मगरपट्टा येथे उघडकीस आली आहे.

जान्हवी अमित कांबळे (वय 22) असे या महिलेचे नाव असून शिवांश काळे असे तिच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार माहितीनुसार, जान्हवी कांबळे गृहिणी असून त्यांचे पती अमित दत्तात्रय कांबळे हे हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तपास पथकात काम करतात. त्यांना दोन वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा होता.

आज पहाटे जान्हवी यानी मुलाच्या तोंडावर उशी दाबून खून करून त्यानंतर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘अमित तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मात्र वेळ देऊ शकत नाही. हे माझे दुर्दैव. माझी सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करीत आहे’ असा उल्लेख आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.