Pune : फक्त बोलू नका, सकारात्मक बदलाचे दूत व्हा ! – डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मान 2018’ सोहळा

एमपीसी न्यूज- भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत ,आणि कृतिशीलतेची कमतरता आहे ,अशा वातावरणात कृतिशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून ‘सकारात्मक बदलाचे दूत’ व्हावे, असा संदेश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्याना दिला.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ आज डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना संस्थेच्या असेम्ब्ली हॉल मध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात देण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . देशमुख बोलत होते .

गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे शिवकुमार डिगे (माजी धर्मादाय आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक -रजिस्ट्रार ,मुंबई ), अन्वर राजन (सचिव , महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ,पुणे ), डॉ . सुमंत पांडे (कार्यकारी संचालक ,जलसाक्षरता केंद्र ,यशदा ,पुणे ), संजय यादवराव (संस्थापक ,कोकण भूमी प्रतिष्ठान,मुंबई ), डॉ. जे . बी . गारडे ( दंतशल्य चिकित्सक,पुणे ) यांना ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ ने गौरविण्यात आले. शिवकुमार डिगे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. सन्मानचिन्ह ,शाल ,पुष्पगुच्छ ,रोख रक्कम असे या सन्मानाचे स्वरूप होते

किशोर धारिया (पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटन ), राजेंद्र आवटे (ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माण ), संजय भंडारी (इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग ) यांना त्यांच्या योगदानाबद्दल ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मान’ गौरवाने सन्मानित करण्यात आले .

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ ने डॉ . शैला बूटवाला (प्राचार्य, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय )आणि जुलेखा शेख (ऑफिस सुप्रीटेंडेंट ,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय ) यांना गौरविण्यात आले .

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.