Pune : वस्त्रोद्योग, लघुउद्योग व गृहनिर्माण क्षेत्राला अधिक सवलती देण्याची गरज – ललित गांधी

एमपीसी न्यूज – रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यासाठी गृहनिर्माण, वस्त्रोद्योग क्षेत्र व लघु उद्योग क्षेत्राला विशेष सवलत देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मांडली.

अर्थसंकल्पानंतर व्यापारी उद्योग जगताच्या अपेक्षा व भावना जाणून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फिक्की द्वारे आयोजित बैठकीत सहभाग घेतला होता. याप्रसंगी बोलत असताना ललित गांधी यांनी आपली भूमिका मांडली.रोजगार निर्माण निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता असलेल्या गृहनिर्माण, वस्त्रोद्योग व लघुउद्योग क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी त्यानीं केली.

याविषयी आढळून आलेल्या विरोधाभासी तरतुदी बद्दल मागण्यांचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिले. अर्थमंत्र्यांनी या मागण्यांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी अर्थ खात्याचे अन्य सचिव टी. के. पांडे, अर्थ खात्याचे महसूल सचिव अजय भूषण पांडे यांच्यासह अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील विविध मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.