Pune : पीएमपीएमएलच्या 7 व्या पर्यटन बससेवेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली (Pune) पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरत असूनआज ( दि. 28 मे ) या पर्यटन बससेवेच्या 7 व्या पर्यटन बससेवेचा शुभारंभ झाला. परिवहन मंडळाचे चिफ मेकॅनिकल इंजिनियर रमेश चव्हाण व चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी कामगार व जनता संपर्क अधिकारी तथा कोथरूड डेपो मॅनेजर अल्ताफ सय्यद, भोसरी डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे, पिंपरी डेपो मॅनेजर भास्कर दहातोंडे, न. ता. वाडी डेपो मॅनेजर संतोष किरवे, निगडी डेपो समन्वयक लक्ष्मण कावली उमाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. निगडी भक्ती शक्ती स्थानक येथे वातानुकूलित बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. 7 चा शुभारंभ करण्यात आला.

Pune : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सात्यकी सावरकरांचे व्याख्यान

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पवार यांच्या संकल्पनेतून पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकांच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता 7 पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलित बसेसद्वारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. 1 मे पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीट दर रुपये 500/- इतका आकारण्यात येतो.

पर्यटन बस सेवा क्र. 7 द्वारे हौशी पर्यटकांना अप्पूघर, इस्कॉन मंदिर मोरया गोसावी मंदिर चिंचवड प्रतीशिर्डी शिरगाव , देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी इत्यादी धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देता येते. पीएमपीएएमएल ने सुरू केलेल्या पर्यटन बस सेवेच्या बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ , भोसरी बस स्थानक, निगडी, मनपा भवन पास केंद्रावर (Pune) करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.