Pune : मराठमोळ्या वैभव लोंढेचं नवीन मराठी रोमॅन्टिक गाणं लाॅन्च

एमपीसी न्यूज – मराठी संगीत श्रेत्रात नवनवीन प्रयोग करणारा आणि मराठी रॅप संगीताला वेगळी उंची देणारा गायक, संगीतकार वैभव लोंढचं नवीन मराठी गाणं प्रक्षेकांच्या भेटीला आले आहे. ‘जीव माझा जाईल’ असं नवीन गाण्याचं नाव असून, स्वत: वैभव आणि अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांनी याच्यात अभिनय केला आहे. यापूर्वी वैभवने ‘भिजलेली तू’, ‘साडी मध्ये दिसते झकास तू’, ‘गॅंगस्टर गाववाला’ आणि ‘खंडेराया झाली माझी दैना’, या प्रसिद्ध गाण्याचे लिखाण व गायण त्याने केले आहे.

डिसेंबरमध्ये चित्रीकरण झालेले हे गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून यु ट्यूब वरती या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. नाविन्यपूर्ण मराठी रॅप आणि उत्कृष्ट चित्रिकरण ही या गाण्याची जमेची बाजू आहे. हे गाणं स्वत: वैभवने लिहिलं असून त्याचं संगीत आणि गायण स्वत:च केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या गाण्यात भाग्यश्रीसोबत त्याची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट अंतर्गत आर्क एंटरटेनमेंट आणि नाथ रंजन यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन तेजस पाटील यांनी केले आहे.

वैभव लोंढेची आत्तापर्यंत बरेच गाणी प्रदर्शित झाली असून तरुणाईमध्ये या गाण्यांची चांगलीच क्रेज आहे. तसेच ‘वन साईड लव्हर’ सारख्या हिंदी गाण्यांच्या माध्यमातून त्याने केलेला वेगळा प्रयोगही प्रेक्षकांनी चांगलाच पसंत केला होता. वैगळी शैली आणि मराठी रॅपचा नवा अंदाज यामुळे वैभव लोंढेची गाणी प्रेक्षक नेहमीच उचलून धरतात. ‌

माझं नवीन गाणं “जीव माझा जाईल” प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे शुटिंग आम्ही डिसेंबरमध्येच पूर्ण केल होत. पण, काही कारणास्तव रिलीज लांबणीवर पडत गेल. या व्हिडिओची कन्सेप्ट हटके आहे. पहिल्यांदाच मराठी नॉन – फिल्मी म्युझिक व्हिडिओमध्ये अस काहीतरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. या काळात हे गाणं तुमचं मनोरंजन करेल, तुम्हाला गाणं आवडेल आणि तुम्ही गाण्याचे बीट्स एंजॉय कराल अशी अपेक्षा वैभव लोंढे याने व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.