Pune : टायरचोर तरुणाला एलसीबीकडून अटक

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या दहाचाकी ट्रकचे टायर काढून नेल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपीला चोरीचे टायर विकताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नायगाव फाटा कुंजीरवाडी येथे करण्यात आली.

सागर दत्तात्रय विचारे (वय 22, रा. नायगाव, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2018 मध्ये लोणी काळभोर येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पार्क केलेल्या चार दाहाचाकी ट्रकचे प्रत्येकी दोन असे एकूण आठ टायर चोरून नेले. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा देखील करीत होते.

आज (बुधवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिती मिळाली की, या गुन्यातील आरोपी नायगाव फाटा कुंजीरवाडी येथे चोरीचे टायर विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी सागर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टायर चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे आठ टायर जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.