Pune : मेंदूसंबंधित आजारांवर नाकावाटे औषधोपचार परिणामकारक – डॉ. अविनाश टेकाडे

एमपीसी न्यूज – मेंदूच्या विविध आजारासाठी किंवा डिसऑर्डरसाठी औषधे, कॅप्सूल, इंजेक्शन यापेक्षाही नाकावाटे औषधे घेतली तर अधिक परिणामकारक ठरतात. आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारासाठी रुग्णांनी नाकावाटे औषधे घेण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीचे  विभागप्रमुख प्राध्यापक  डॉ. अविनाश टेकाडे यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग यांच्या तर्फे ‘मज्जासंस्था व आधुनिक उपचारपद्धती’ या विषयावर व्याख्यानाचे आज (मंगळवार)  आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजूरकर, विनय र.र, दीपाली अकोलकर, अशोक तातुगडे, डॉ. सुजाता बरगले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. टेकाडे म्हणाले, ताणतणाव, भोवळ येणे, एपिलेप्सी, ब्रेन ट्युमर, आल्झयमर, पार्किन्सन डिसिज असे विविध मेंदूचे आजार आहेत. मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी नवनवीन प्रणाली विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाचा यामध्ये उपयोग होत असून नाकावाटे औषधे घेतल्यास अडथळ्याविना थेट केंद्रीय मज्जासंस्थेपर्यंत पोहचतात आणि याचे विपरीत परिणामही होत नाहीत व रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.  तसेच भविष्यात मेंदूचे आजार होऊ नयेत, यासाठी योगा, व्यायाम, चालणे, सायकलिंग आदी गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.