Pune : एलईडी, ‘पुणे कनेक्ट’मध्ये भाजपच्या काळातच गैरव्यवहार ; खास सभा बोलावण्याची विरोधकांची मागणी

एमपीसी न्यूज – एलईडी, ‘पुणे कनेक्ट’ यांमध्ये गैरव्यवहार हा भाजपच्याच काळात झाला असून, यावर चर्चा करण्यासाठी खास सभा बोलवावी. यामध्ये आम्ही पुरावे सादर करू, असे आव्हान काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिले आहे.

महापालिकेमध्ये एलईडी आणि डेटा करप्ट व ‘पुणे कनेक्ट या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाला असून, हा गैरव्यवहार 2016 म्हणजेच आघाडीची सत्ता असताना झाला आहे, असा आरोप भाजपने केला होता.

याविषयी शिंदे म्हणाले की, ‘पुणे कनेक्ट’ आणि इतर विषयांबाबत सर्वसाधारण सभेत गंभीर चर्चा झाली. सभागृह नेत्यांनी आयुक्तांना पत्र देऊन भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. हा भ्रष्टाचार पूर्वीच्या काळात झाल्याचे म्हटले आहे. मात्र, तो भाजपच्याच काळात झाल्याचा हल्लाबोल चेतन तुपे यांनी केला.

प्रशासनावर या सत्ताधा-यांचे कोणतेही नियंत्रण नाही. यांच्या परस्पर डेटा करप्ट झाल्याचे पत्र अधिकाऱ्यांकडून दिले जाते. यापूर्वी कधीही असे घडले नसल्याचे तुपे म्हणाले. 2014 पासून भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. तेव्हापासूनच महापालिकेच्या कामकाजात लक्ष घातले जात होते. सत्ताधा-यांनी साडेआठ कोटींची सॉफ्टवेअर निविदा काढून भ्रष्टाचार केला आहे. डेटा करप्ट झाल्याची आठवण तुपे यांनी करून दिली. तर, सभागृहनेत्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे कबूल केले आहे. त्यांनी आता माघार घेऊ नये. या विषयावर भाजपने कधीही विरोधात मतदान केले नसल्याची आठवण अरविंद शिंदे यांनी करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.