Pune : लीला पूनावाला फौंडेशनतर्फे लीला गर्ल्ससाठी अनफोल्डिंग टॅलेंट कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने गावडेवाडी येथील हिरकणी महाविद्यालयात आर्टस् , कॉमर्स आणि सायन्सच्या लीला गर्ल्ससाठी आयोजित अनफोल्डिंग टॅलेंट या एक दिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गावडेवाडी , पुणे – लीला पूनावाला फौंडेशन द्वारा नुकतेच हिरकणी महाविद्यालय येथे आर्टस् , कॉमर्स आणि सायन्स च्या लीला गर्ल्स साठी ” Unfolding talent” या एकदिवसीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले.

ट्रेनर रिता शेटीया (लीला फेलो 2005) आणि सोनल जगताप (लीला फेलो 2013) यांनी या कार्यशाळेत सॉफ्ट स्किल्सच्या अंतर्गत देहबोली, वेळेचे व्यवस्थापन, संयम, लवचिकता, नेतृत्व, टीमवर्क, रेट ऑफ स्पीच, संभाषण, भाषा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. विविध खेळाच्या माध्यमातून याचा वापर करून आपण कशा प्रकारे यश संपादन करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवले. आजच्या स्पर्धेच्या युगात सॉफ्ट स्किल्स, प्रत्येक क्षेत्रात किती महत्वाचे आहे आणि याचा योग्य उपयोग नोकरी मिळवताना, व्यवसाय करताना कशाप्रकारे करावा या विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.

स्वतःमधील क्षमता, सामर्थ्य आणि कमतरता ओळखणे आणि येणाऱ्या समस्या, धोके यांना कशाप्रकारे सामोरे जावे, स्वतः वर प्रेम आणि आदर केला तरच आपण दुसऱ्याचा आदर आणि प्रेम करू शकतो. याविषयी विविध कार्यामधून मार्गदर्शन केले. सर्व लीला गर्ल्सला या कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले .

या कार्यशाळेतील सहभागी लीलागर्ल समरीन म्हणाली की, या कार्यशाळेमुळे आम्हाला आमच्यातील सामर्थ्य आणि कमतरता काय आहेत हे कळले. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्यात सॉफ्ट स्किल्स असणे किती महत्वाचे आहे याचे ज्ञान आम्हाला झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.