Pune : काँगेस भवनमध्ये आमदार संग्राम थोपटे समर्थकांचा राडा; बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप

मंत्रीपद देण्याचे केले होते कबूल; कार्यकर्त्यांचा दावा

एमपीसी न्यूज – भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी काँगेस भवनमध्ये अक्षरशः राडा घातला. प्रचंड प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. विशेष म्हणजे आताच 28 डिसेंबर रोजी काँगेस पक्षाचा वर्धापनदिन होता. त्यानिमित्ताने रंगरंगोटी करण्याचे काम जोरात सुरू होते. थोपटे समर्थकांनी अतोनात नुकसान केल्याने पुन्हा काम करण्याची वेळ आली आहे. काँगेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर कार्यकर्त्यांनी यावेळी गंभीर आरोप केले.

संग्राम थोपटे हे 2009 पासून 3 वेळा निवडून आले. भोर-वेल्हा-मुळशीच्या आमच्या मावळ्याला मंत्रिपद देणे गरजेचे होते. अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तर, तोडफोड करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला.

थोपटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे अश्वासन देण्यात आले होते. ते पाळण्यात आले नाही. एकच वादा संग्राम दादा, आशा घोषणाही यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. काँग्रेस भवनमध्ये तोडफोड करणाऱ्या 15 ते 16 जणाना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण, अजूनही याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

काँगेस भवनमध्ये खुर्च्या आणि टेबलांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. थोपटे यांनी पक्षासाठी मेहनत घेतली तरीही त्यांना डावलण्यात आलं असा आरोप समर्थकांनी केला. संग्राम थोपटे आमचं आशास्थान आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने आम्ही काँग्रेस भवन फोडल्याचे युवा कार्यकर्त्यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी शब्द पाळला नाही, असेही संतप्त कार्यकर्ते म्हणाले.

तर, काँग्रेस भवनची तोडफोड करणे अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे. तोडफोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट ईशारा काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकरांशी बोलताना दिला. त्यांच्या समर्थकांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ‘हायकामंडशी’ चर्चा करावी. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर संग्राम थोपटे यांच्या समर्थकांना पळवून लावण्यात आले.

याबाबत आमदार संग्राम थोपटे म्हणाले, मला या तोडफोडीबाबत माहिती नव्हती. झालेला प्रकार निंदनीय आहे. ज्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्या कार्यकर्त्यांची माहिती घेतोय. पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्य आहे. तो पुढेही मानला जाईल. कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, शांतता पाळावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.