BNR-HDR-TOP-Mobile

Pune- एनडीए परिसरात बिबट्याचा वावर ; परिसरात भितीचे वातावरण

INA_BLW_TITLE

( प्रतीकात्मक फोटो )

एमपीसी न्यूज – एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) परिसरात बिबट्या आढळून आल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी काल शुक्रवारी (दि. 11) एनडीए परिसरात राहणा-या नागरिकांनी वनाधिका-यांना भेटून निवेदन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनडीए परिसरातील फिल्ट्रेशन प्लांट, त्रिशक्ती गेट, पाषाण गेट लॉंग रेंज, गोल्फ कोर्स या भागांमध्ये बिबट्या आढळून आला आहे. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वेळीच सावधातना बाळगत तेथील नागरिकांनी अधिका-यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी एनडीए परिसरात सूर्यास्तानंतर एकटे फिरू नये, लहान मुलांना रात्री उशिरा एकटे सोडू नका, घरांच्या आणि आसपासच्या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. त्याचबरोबर बिबट्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास ती तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडे कळवावी असे सांगितले आहे.

एनडीए परिसरात राहणा-या नागरिकांनी वनाधिका-यांना भेटून निवेदन दिले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.