Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे दोन तरुण जखमी

एमपीसी न्यूज : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे (Pune News) दोन तरुण जखमी झाल्याची घटना काल सोमवार 12 डिसेंबर रोजी ओतूर येथे घडली आहे.

सोमवार, डिसेंबर 12 रोजी संध्याकाळी 7:35 वा चे दरम्यान सचिन शंकर वाकचौरे, रा. वाकचौरेमळा गोटीशिवार यांनी दूरध्वनीवरून सुधाकर गिते, वनपाल ओतूर यांना बिबट्याच्या हल्ल्या बाबत माहिती दिली. त्यांनी ती माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी-ओतुर वैभव काकडे यांना दिली.

अक्षय बाळासाहेब अहीनवे व आदित्य संदीप वाकचौरे येथील जुना सारणी रोडवरुन मोटारसायकल वरुन जात असताना 7 वा च्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.(Pune News) अक्षय बाळासाहेब अहीनवे याच्या उजव्या पायास, पोटरीस व पोटास जखमा झाल्या आहेत. आदित्य संदीप वाकचौरे याच्या उजव्या गुडघ्यास किरकोळ जखम झाली होती.

Pimpri News : थेरगाव सोशल फाउंडेशन मार्फत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषित पाणी व मृत मासे भेट

वनपाल ओतुर सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड व  पी के खोकले, वनमजुर फुलचंद खंडागळे यांनी घटना स्थळी जाऊन जखमी तरुणांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

आदित्य संदीप वाकचौरे यांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले. अक्षय अहीनवे यांना पुढील उपचारासाठी पुणे जिल्हा रुग्णालय औंध येथे पाठविण्यात आले.

ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पॉइंट सुधाकर गीते व नक्षक सुदाम राठोड पिके खोकले वनमजूर फुलचंद खंडागळे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने (Pune News) बिबट हल्ला झालेल्या परिसराची पाहणी केली. वन विभागाकडून या परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. वनपाल सुधाकर गिते यानी सांगितले की, गावामध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.