Pune : चला व्यसनाला बदनाम करू या !अंनिस कडून 16 ते 31 डिसेंबर पर्यंत उपक्रम राबविणार

एमपीसी न्यूज : अंधश्रद्धा निर्मूलन समिती ला 30 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 16 ते 31 डिसेंबर दरम्यान चला व्यसनाला बदनाम करू या! ही मोहीम राबविण्यात येणार आहे . पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी माहिती दिली.

यावेळी अविनाश पाटील म्हणाले की, राज्यभरात व्यसनाचे प्रमाण वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर आता आम्ही चला व्यसनाला बदनाम करू या ! या मोहिमे अंतर्गत नव्या वर्षाला निरोप देण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी दूध वाटपाचे काम केले जाणार आहे. या माध्यमातून तरुण पिढीने व्यसना पासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच बरोबर राज्य सरकारने दारूची दुकाने सकाळी 8 वाजल्या पासून सुरू करण्याचे परिपत्रक काढले आहे. यातून सरकार व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. या सर्व प्रकारचा निषेध करणारे मुख्यमंत्र्यांचा निवेदन प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.