-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : ‘ग्रंथालय बहिस्थ कार्यशाळा’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च यांच्या वतीने ‘ग्रंथालय बहिस्थ कार्यशाळा “पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (चिखलसे, तालुका मावळ) येथे घेण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाद्वारे वाचनाची सवय वृद्धिंगत होण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेतील मुलांना “डाएट व नुट्रीशन” संदर्भातील पुस्तके वाटून त्याचे महत्व सांगण्यात आले. तसेच वाचन सवयी वृद्धिंगत होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल सौ चंदा सुपेकर यांनी केले होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. पुनीत बसन, प्रा. अरुण देवकर तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता फ्रान्झ यांचे मार्गदर्शन लाभले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.