Pune: डॉ. अरुण भस्मे यांना जीवन गौरव पुरस्कार

Pune: Lifetime Achievement Award to Dr. Arun Bhasme डॉ. अरुण भस्मे हे गेल्या वर्षी प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. ते 1976 पासून बीडच्या होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहात होते.

एमपीसी न्यूज- होमिओपॅथीच्या प्रचार, प्रसार आणि प्रतिष्ठापनेसाठी आयुष्यभर काम केलेले होमिओपॅथी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्याशाखेमधून या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित व्हर्चुअल कार्यक्रमात ही घोषणा केली.

विद्यापीठाच्या स्थापनेला 22 वर्ष झाल्याच्या निमित्ताने वैद्यकीय शाखेतून डॉ. अरुण महाले, डॉ. इंद्रप्रकाश गजभिये, डॉ. डी. आर. मुखेडकर, दंत विद्याशाखेतून डॉ. शरद कोकाटे, आयुर्वेद विद्याशाखेतून वैद्य नारायण गांगल यांनाही जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत.

डॉ. अरुण भस्मे हे गेल्या वर्षी प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. ते 1976 पासून बीडच्या होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहात होते. त्यांच्या काळात बीड येथे मराठवाड्यात बीएचएमएस पदवी अभ्यासक्रम प्रथम सुरू झाला.

1992 मध्ये डीएएमएस झालेल्या डॉक्टरासाठी बीएचएमएस ग्रेडेड अभ्यासक्रम, 1994 मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम होमिओपॅथीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणारे तसेच 2007 मध्ये पीएच. डी. सुरू करणारे पहिले महाविद्यालय आहे.

त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठात होमिओपॅथी विद्याशाखा सुरू करण्यासाठी डॉ. भस्मे यांनी प्रयत्न केले होते. या विद्यापीठाच्या होमिओपॅथी अभ्यास मंडळाचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले.

याच विद्यापीठाच्या विद्याशाखेतून केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर पाच वेळा ते बिनविरोध निवडून गेले. परिषदेच्या शिक्षण समिती, एक्जक्युटिव्ह समिती आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले. याच माध्यमातून देशभरात होमिओपॅथीचा विकास व प्रसार करण्यास मदत झाली.

महाराष्ट्राबाहेरील अनेक विद्यापीठात होमिओपॅथी व अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून काम केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली 39 एम.डी. विद्यार्थ्यांना तसेच 12 डॉक्टरांचे पीएच.डी. गाईड म्हणून काम केले, 14 रिसर्च जर्नलमध्ये रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.