Pune : साडेचार वर्षांच्या चिमुकल्याने सर केला लिंगाणा; किल्यावर ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष

एमपीसी न्यूज – रायगडासमोरील स्वराज्याचे कारागृह असणारा लिंगाणा किल्ला साडेचार वर्षांच्या श्लोक आंद्रे याने सर केला आहे. चढाईस अत्यंत कठीण असणारा हा सुळका जवळपास 3000 फूट उंच आहे.

लहानपणापासून दुर्गभ्रमंतीची आवड असणाऱ्या आणि आत्तापर्यंत जवळ पास 15 किल्लांवर भटंकती केलेला श्लोक आंद्रे यांने या वर्षीच्या शिवजयंती निम्मिताने आगळी वेगळी कामगिरी केली आहे. रायगडासमोरील 2969 फुटांचा कठीण श्रेणीतील सुळखा अवघ्या साडेचार वर्षांच्या श्लोकने सर केला आहे. दोरखंडाच्या मदतीने दगडांचा आधार घेत त्याने किल्ल्याचे टोक घाटले. किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जय घोष करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर त्याने दुध व जल अभिषेक केला.

स्वतः दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धनची कामे करणारे सचिन आंद्रे हे व्यवसायाने आय टी इंजिनिअर आहेत. सचिन आंद्रे सांगतात श्लोकला गड किल्लांवर भटकंती करायला आवडते आणि गिर्यारोहण व दुर्ग संवर्धनाच्या मोहिमेत तो हिरहिरीने सहभागी होतो. वडिलांच्या बरोबर श्लोक ने आत्तापर्यंत 15 किल्ल्यांवर भटकंती केली आहे.

लिंगाणा सर करण्यासाठी आरोहण साहित्य व त्या संबंधित गोष्टींची तयारी असावी लागते. सह्याद्री प्रतिष्ठान आणि एस एल ऍडव्हेंचर तसेच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा अवघड लिंगाणा किल्ला सर करून दाखवला आहे. या मोहिमेत त्यांच्या बरोबर लहू उघडे, कृष्णा मरगळे, रितेश गोपाळे, रोहित अंतुडगे, तुषार दिघे हे दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.