BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लायन्स क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी आयोजित रक्तदान शिबिरात 160 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- ‘लायन्स क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी’ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 160 जणांनी रक्तदान केले.

रविवारी (दि. 11) दादावाडी मंदिर,सारसबाग येथे हे रक्तदान शिबिर झाले. दादावाडी मंदिराचे विश्वस्त ओमप्रकाश रांका यांनी शिबिराचे उद्घाटन केले. क्लबचे अध्यक्ष विजय राठी, सचिव अजित चौहान, खजिनदार महावीर ओस्वाल यांनी स्वागत केले. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रती कृतज्ञता, स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिराचे हे तिसरे वर्ष होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3