Pune : वारजेत बिबट्या दिसल्याचा स्थानिकांचा दावा, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील वारजे माळवाडी येथील गणपतीमाथा परिसरात बुधवारी रात्री बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला.

या दाव्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. हाच बिबट्या आज सकाळी पुन्हा एकदा दिसल्यानंतर नागरिकांनी वनविभागाला याची माहिती कळवली. त्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी आणि वारजे पोलिसांचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या बिबट्याचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.