Pune News : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला मेगा ब्लॉकमुळे ब्रेक

एमपीसी न्यूज :  पुणे-लोणावळा तर पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस या रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वेस्थानका दरम्यान लोहमार्गावर (Pune News) होणाऱ्या कामासंदर्भात हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्ग हा रस्ते वाहतुकीने करणे योग्य ठरणार आहे.

पुणे शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावर रेल्वे रूळ जोडण्याबरोबर काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Alandi News : आळंदी परिसरातील डी.पी. मधील तारा व ऑईल चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड

तळेगाव ते पुणे दरम्यान धावणारी दुपारीची 4.30 वा लोकल फेरी ही रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते तळेगांव दरम्यान धावणारी सकाळी 8:57 दुपारीची 3.42 च्या लोकल (Pune News) फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.

रविवारी दोन्ही गाड्या रद्द केल्याने लोणावळा स्थानकातून सकाळी 10 वाजून 20 वाजता सुटणारी  लोकल तुडुंब भरली होती. तर सकाळी 7 वाजून 20 च्या लोकलला ही नेहमी पेक्षा जास्त गर्दी पहाला मिळाली. प्रवाश्यांनी वरील बदलांची नोंद घेऊन गैरसोय टाळावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.