Pune Lockdown Update: ई-पासऐवजी कर्मचाऱ्यांना चालणार कंपनीचे पत्र

Pune Lockdown: Company letter to employees instead of e-pass during lockdown लॉकडाऊनबाबत आयुक्तांचा सुधारीत आदेश, राष्ट्रीयीकृत बँकाही सुरू राहणार

एमपीसी न्यूज – आज मध्यरात्री पासून पुणे शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत विविध कंपन्यांमधील कामगार, अधिकारी यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस आणि पुणे महापालिकेच्या पासची गरज लागणार नाही. संबंधित कंपन्यांच्या एचआर विभाग प्रामुखाचे पत्रच चालेल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री काढलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे.
पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, कृषी कंपन्या, आयटी कंपन्या, औद्योगिक आस्थापना, दूरसंचार कंपन्या या लॉकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. या सर्व कंपन्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी सुधारित आदेश काढून दिलासा दिला आहे.
कामगार- अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका यांना वेगळ्या पासची गरज नाही.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पेट्रोल पंप आता सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर, उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.
पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.