_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Lockdown: जाणून घ्या… पुणे जिल्ह्यातील कोणत्या भागात असेल यावेळचा लॉकडाऊन?

Pune Lockdown: Find out ... Which part of Pune district will have this lockdown this time?

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच दोन्ही पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात, जिल्ह्यातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रे तसेच हवेली तालुका व ठराविक ग्रामीण क्षेत्रात सोमवारी मध्यरात्रीपासून ते 23 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 13 ते 18 जुलै दरम्यान अत्यंत कडक राहील. त्यात फक्त दूध विक्री, औषधांची दुकाने, रुग्णालये व स्वच्छता, पाणी पुरवठा या संदर्भातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. बाकी कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी या काळात होणार नाही. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी रविवारी व सोमवारी भाजीपाला, धान्य, फळफळावळ तसेच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

लॉकडाऊन बाबत सविस्तर आदेश व मार्गदर्शक सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे काढतील. शासकीय कार्यालयांमध्ये किती कर्मचारी असावेत, यासह सर्व बाबींचे स्पष्टीकरण त्यात करण्यात येईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.