Pune : कोरोना रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा उपाय नाही -विवेक वेलणकर

'Lockdown' is not a solution to prevent corona - Vivek Welankar : कोरोना रोखण्यासाठी 'लॉकडाऊन' हा उपाय नाही -विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – कोरोना रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा काही उपाय नाही. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत आहेत. उलट जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर पुणे महापालिकेचा भर आहे. ‘लॉकडाऊन’ करून आणखी किती दिवस लोकांना उपाशी मारणार, असा संतप्त सवाल सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

तर कोरोनाचे संकट आटोक्यात येण्यासाठी आणखी कडक उपययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केले आहे.

कोरोनाच्या सध्या दररोज 4 हजार चाचण्या होत आहेत. त्यामध्ये 800 रुग्ण आढळून येत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे आता 21 हजार 520 रुग्ण झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर झाला आहे. अन्नधान्य वाटपापासून, जेवण, आरोग्य सेवा पुरविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातूनच अनेक नगरसेवकांना कोरोना होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like