Pune: कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच लॉकडाऊन – विक्रम कुमार

Pune: Lockdown just to break the corona chain - Vikram Kumar Se

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
या कालावधीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पुण्यात सध्या 27 हजार 525 रुग्ण झाले आहेत. तर, 17 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहे. सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.
त्यानंतर 5 दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही तास सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांनी पहिल्या दिवसापासून प्राधान्य दिले आहे. बिबवेवाडीतील कोविड रुग्णालय पाहणी, त्यानंतर व्यापाऱ्यांसोबत बैठकीला हजेरी लावली.
दुसरीकडे लॉकडाऊन सुरू होण्यास काही तास शिल्लक राहिल्याने पुणेकरांनी बाकी राहिलेल्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घेतली. हा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन असेल, त्यामुळे पुणेकरांनी गैरसोय होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली आहे.
पेट्रोल – डिझेल सर्वसामान्य माणसाला मिळणार नसल्याने आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी टाकी पूर्ण भरून घ्यायलाच प्राधान्य देण्यात येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.