Pune : भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘लॉकडाऊन मोमेंट्स’ ऑनलाईन स्पर्धा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन मोमेंट्स’ या स्पर्धात्मक व संवादात्मक ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, लॉकडाउन काळात नागरिकांना व्यक्त होण्यासाठी व त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात राज्याचे प्रभारी संजय कौडगे यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडत असून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील हे या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.

या उपक्रमांतर्गत एकूण चार प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत.

1)’वक्ता महाराष्ट्राचा’ या वक्तृत्व स्पर्धे अतंर्गत स्पर्धकांना हिंदी किंवा मराठी भाषेत दिलेल्या पैकी एका विषयावर आपल्या भाषणाचा 5 मिनिटांचा व्हिडीओ भाजयुमोच्या संकेतस्थळावर पाठवायचा आहे.

वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय खालील प्रमाणे-

# कोरोनानंतर जागतिक पटलावरील भारत
# लॉकडाऊननंतर नव्याने निर्माण होणार्‍या संधी
# कोरोनाने गुंफले कौंटुंबिक रेशमी बंध

2) ‘टास्क टू मेक मास्क’ या अंतर्गत स्पर्धकांना आपल्या अभिनव कल्पना वापरुन मास्क तयार करायचे आहेत. स्पर्धेकांना या मास्कसह स्वतःचा सेल्फी अथवा फोटो नावनोंदणी करून संकेतस्थळावरून पाठवायचा आहे.

3) ‘लॉक डाउन क्लिक’ या छायाचित्र स्पर्धेमध्ये ‘लॉक डाऊन काळात घरातूनच टिपलेले छायाचित्र’हा विषय असून अ‍ॅमेचर फोटोग्राफी म्हणजेच मोबाइलने टिपलेले छायाचित्र व प्रोफेशनल फोटोग्राफी हे दोन प्रकारांचा समावेश असणार आहेत.

4) ‘लेटर टू रियल हिरोज’ ही पत्रलेखनावर आधारीत स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. एक पत्र-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, एक पत्र आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या आशयावर पत्रलेखनाची ही स्पर्धा पार पडेल.

पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पत्रकार, विद्युत कर्मचारी, बँक कर्मचारी यांच्यासह स्पर्धकांच्या दृष्टीतून असणार्‍या खर्‍या हिरोंकरीता पत्रलेखन करता येईल.

स्पर्धकांनी आपले साहित्य 24 मे, रात्री 9च्या पूर्वी www.bjymmaharashtra.org या संकेतस्थळावर पाठवायचे आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजयुमो चे सर्व प्रदेश व जिल्हा तसेच मंडल पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत तसेच अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आव्हानही त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.