Pune : लॉकडाऊन; पत्नीशी भांडणाऱ्या नवऱ्यावर ‘क्वारंटाईन’ची कारवाई करु – पुणे जिल्हा परिषदेचा इशारा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. या काळात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे घरी राहणाऱ्या पती पत्नीमध्ये भांडणे आहेत. त्याची दाखल ज़िल्हा परिषदेने घेतली आहे. पत्नीशी भांडण केले तर नवऱ्याला क्वारंटाईन व्हावे लागेल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेने दिला आहे.

पुणे ज़िल्हा परिषदेची दक्षता समिती यावर उपाययोजना करणार आहेत. जिल्ह्यात लोकडाऊनच्या काळात पती – पत्नीमध्ये भांडणे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची जिल्हा परिषदेने तातडीने दाखल घेतली आहे. भांडणाऱ्या नवऱ्यांना क्वारंटाईन करण्याचा इशारा ज़िल्हा परिषदेने दिला आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भांडखोर नवरोबांना शाळा, अंगणवाडीमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना त्रास देऊ नका, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात क्वारंटाईन करण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.