Lohgaon: संतनगर येथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज – पुण्यात लोहगाव- वाघोली रस्त्यावरील संतनगर येथे एका फर्निचर बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन फायरगाङ्या व दोन वाॅटर ब्राऊझर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाहीत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर असल्याने आग चांगलीच भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोदामातील सर्व फर्निचर व लाकूड जवळजवळ जळून खाक झाल्याने आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.