Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणुक : मित्र पक्षाची ताकद जास्त असेल ती जागा त्यांना मिळावी : अजित पवार

एमपीसी न्यूज :  पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लवकरच होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.त्यावरून भाजप आणि महा विकास आघाडी मधील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून आम्हीच पुण्याची जागा लढविणार अशी विधान केली जात आहे.

Pune – माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारपासून पुण्यात

त्याच दरम्यान पुणे शहराच्या दौर्‍यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार होते.त्यावेळी त्यांना पुणे लोकसभा पोटनिवडणुकी बाबत विचारले असता ते म्हणाले की, पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच निधन झाले.त्यानंतर लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे पोटनिवडणुक लागणार नाही. मला अस वाटत होते. पण मला मिळालेल्या माहितीनुसार,पुणे लोकसभा पोटनिवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे.

मागील महापालिका निवडणुकीत पुणे शहरातील आठ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची आणि आमदाराची संख्या लक्षात घेता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून येते .त्यामुळे आता जी निवडणुक जाहीर होईल. मित्र पक्षाची ताकद जास्त असेल ती जागा त्यांना मिळावी.ताकद जास्त म्हटल्यावर वजन करायच का ? तर नाही. मागील निवडणुकीचा अंदाज घ्यावा एवढीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यातून पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दावा केल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेसकडून आमचा पारंपरिक मतदारसंघ असल्याच म्हटलं जात आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असून ते बोलत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेछा असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना कोणाची हे मतदाराच ठरवतील : अजित पवार

मागील जवळपास वर्षभरापासून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये खरी शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे.त्यावरून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सतत टीका केली जात आहे. त्याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या पक्षाची घटना मागवली आहे.त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, तुला एक सांगू का ? शिवसेना कोणाची हे मतदाराच ठरवतील अशी भूमिका त्यानी मांडली.

 

तपास केल्यानंतर वेगळे आकडे येतात : अजित पवार

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुणे जिल्हयात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा आरोप केला आहे.त्याबाबत काल कुटुंबीयांना समोर आणत भूमिका मांडली.त्यावर अजित पवार म्हणाले की,त्या प्रकरणा बाबत चौकशी झाली पाहिजे.खरी वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे.बर्‍याचदा अनेक गोष्टी बोलल्या जातात.खोलावर गेल्यावर वेगळच चित्र समोर येते. आम्ही ही बाब सभागृहात देखील पाहिली असून त्वेषाने सभागृहात बोलत असतात.मोठ मोठी आकडेवारी सांगत असतात आणि तपास केल्यानंतर वेगळे आकडे येत असल्याचे सांगत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.

मंदिरात दर्शनाला जाताना तोकडे कपडे घालून जाऊ नये : अजित पवार

राज्यातील मंदिरात वेषभूषा बद्दल आदेश काढण्यात आला आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, आपल्या येथील एखाद्या तीर्थ क्षेत्रामध्ये केरळ येथील नागरिक दर्शना करीता लुंगी घालून आले. तर त्यांना काय करणार असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की  , आपल्या संस्कृती प्रमाणे मंदिरात दर्शनाला जाताना तोकडे कपडे घालून जाऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली.

PCMC : नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा डाव

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.