Pune Loksabha Election : यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत मनसे आणि एमआयएमची मते निर्णायक ठरणार

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित या तिन्ही उमेदवारांत जोरदार लढत झाली.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मनसे आणि एमआयएमची मते निर्णायक(Pune Loksabha Election) ठरणार आहे.

 

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण  20 लाख 61 हजार 276 मतदार असून यामध्ये 10 लाख 57 हजार 877 पुरूष मतदार, 10 लाख 3 हजार 75 महिला मतदार आणि 324 इतर मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 3 हजार 678 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामध्ये 5 लाख 84 हजार 511 पुरुष तर 5 लाख 19 हजार 78 महिला आणि इतर 89 जणांनी मतदान केले आहे.

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघात 53.54 टक्के मतदान; जाणून घ्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान?

पर्वती, पुणे छावणी, कसबा पेठ, शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले मतदान झाल्याची चर्चा सुरू असून कोंढवा, वडगांवशेरी, येरवडा भागात कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याचे कळते. या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मनसे पक्षातून वंचित बहुजन आघाडी पक्षात आलेले  वसंत मोरे यांनीही चांगली मते मिळविल्याची कुजबुज सध्या सर्वत्र सुरू आहे.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी या लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला असून पुणेकरांना 4 जून रोजी काय निकाल लागतो, याची उत्सुकता(Pune Loksabha Election) लागलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.